गाव तिथे मनसेची शाखा उघडा - राजु उंबरकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात
वाशीम - जिल्हयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेची पक्षबांधणी, निवड व अंगीकृत संघटनेच्या पदनियुक्तीच्या अनुषंगाने मनसेच्या राज्य पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 6 मार्च शासकीय विश्रामभवनात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार तसेच मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पदाधिकार्यांच्या जिल्हा दौर्यादरम्यान सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अध्यक्षस्थानी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद एंबडवार यांची उपस्थिती होती. यावेळी शाल व ग्रामदैवत श्री बालासाहेबांची मुर्ती देवून महाराष्ट्रीयन परंपरेनुसार राज्य पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला मनसेचे जिल्हयातील माजी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, विद्यार्थी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, मनोज खडसे, मनिष डांगे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पदाकरीता राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर व आनंद एंबडवार यांनी आवाहन केले. बैठकीचे सुत्रसंचालन व आभार मनिष डांगे यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये राजु उंबरकर यांनी पक्ष संघटनेची बांधणी व पक्षाला भरारी देण्याकरीता कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा अभियान राबवून प्रत्येक गावामध्ये मनसेचा झेंडा रोवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी पक्षाची बांधणी व संघटन मजबुतीकरण करावे असे आवाहन केले. यावेळी बैठकीला इंदल राठोड, जयकिसन जाधव, माजी तालुकाध्यक्ष हनुमान घोडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रवि वानखेडे, महादेव भस्मे, पियुष देशमुख, राजेश इंगोले, ऋतिक चव्हाण, भालचंद्र शामसुंदर, कपिल महाजन, अनुप ठाकरे, रेखा चव्हाण, वंदना अक्कर, संगीता चव्हाण, बेबी धुळधुळे, बेबी कोरडे, अर्चना इंगळे, बेलोकारताई, जयश्री गजरे, स्मिता जोशी, रेणूका डांगे, आकाश राठी, केतन जागृत, माणिक राठोड, बाळु गोरे, भाऊराव घाटे, जनार्दन सोनटक्के, राहुल इंगोले, गोरख बोरकर, अमोल मुळे, अमोल घाटे, राजु गायकवाड, रामदास पवळ, परशराम दंडे, केशव कांबळे, धनीराम बाजड, शिवाजी नवगणकर, जुनघरे, महंमद नौरंगाबादी, मारोती मुके, राम श्रीमंत, गजानन कव्हर, राजु आमटे, बन्सोेड, सुखदेव वैरागडे, सुभाष मुठाळ, बाबाराव सोनोने, किशोर गजरे, विजय नाईकवाडे, अमोल वानखेडे, गजानन वैरागडे, गोपाल मोटे, गोकुल जाधव, रमेश चव्हाण, संतोष आंबेकर, पांडूरंग चांडे, वसंतराव चांडे, माणिक उलेमाले, सिता ढोके, सागर धुळधुळे, गणेश कदम, आकाश अवचार, राजु आमटे आदी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गाव तिथे मनसेची शाखा उघडा - राजु उंबरकर