दिव्यांग कल्याण निधीसाठी पंचायत समिती स्तरावर ग्रामसचिवामार्फत अर्ज करा
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनिष डांगे यांचे आवाहन
वाशीम - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी दिव्यांग कल्याण निधीत शिल्लक असलेला रु. १९ लाख २० हजार रुपयाचा निधी जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग बचत गटाकरीता वितरीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २२ एप्रिल रोजी काढले असून यासाठी अर्ज भरण्याची मुदत येत्या १२ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. तरी जिल्हयाच्या ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव व दिव्यांग बचत गटाच्या सदस्यांनी विहीत मुदतीत पंचायत समिती ग्रामसचिवामार्फत अर्ज सादर करण्याचे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनिष डांगे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग कल्याण निधीत शिल्लक असलेल्या १९.२० लाख निधीसाठी अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यत ठेवण्यात आली होती. मात्र ही मुदत दिव्यांगांना अर्ज सादर करण्यासाठी पुरेशी नसल्याचे कारण देवून अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जि.प. प्रशासनाकडे करण्यात आली होती. या निवेदनाची जि.प. प्रशासनाने दखल घेवून ३० एप्रिल पर्यत असलेली मुदत १२ मे पर्यत वाढविली आहे. त्यामुळे या वाढीव मुदतीचा लाभ घेवून जिल्हयातील दिव्यांग बचत गट व दिव्यांग बांधवांनी निधी मिळण्याबाबतचे अर्ज ग्राम सचिव यांच्यामार्फत पंचायत समिती स्तरावर पाठविण्याचे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मनिष डांगे, विदर्भ संपर्क प्रमुख केशव कांबळे, विदर्भ सचिव नामदेव कांबळे, विदर्भ सहसचिव गोपाल मोटे, राज्य संचालिका कु. बालीका होलगरे, सौ. वंदना अक्कर, माजी जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर, जिल्हाध्यक्ष परशराम दंडे, राज्य संचालीका बेबी कोरडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष बेबीबाई धुळधुळे, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातव, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, जयसिंगराव घुगे, दौलत अंभोरे, अब्दुल सत्तार, सचिव परशराम दंडे, जिल्हा सचिव रेखा चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष व्दारकाबाई सावके, जिल्हा उपाध्यक्ष यमुनाबाई बेलखेडे, वाशीम तालुका संपर्कप्रमुख अनिल भगत, तालुका अध्यक्ष शिवाजी नवगणकर, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष विठ्ठल गादेकर, तालुका कार्याध्यक्ष मनोज इंगळे, मानोरा तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, रिसोड तालुका अध्यक्ष धनीराम बाजड, कारंजा तालुका अध्यक्ष ब्रम्हदेव बांडे, मालेगाव तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर, विधानसभा अध्यक्ष राधेशाम जाधव, नितीन गोटे, पंजाबराव अंभोरे (वाकद शाखा अध्यक्ष), सिताबाई ढोके, दिपाली नखाते, प्रमिला थोरात, रेखा चव्हाण, कामरगाव शाखा अध्यक्ष योगीराज लाडवीकर, दिलीप जुनघरे, मिना लुटे आदींनी केले आहे.
दिव्यांग कल्याण निधीसाठी पंचायत समिती स्तरावर ग्रामसचिवामार्फत अर्ज करा